सुविचार संग्रह

दैनिक टाचण तसेच फळ्यावर लिहिण्यासाठी सुविचार


📝🍀सुविचार🍀📝

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
******
अतिथी देवो भव ॥
******
अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.
******
दु:ख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत रहा.
******
आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
******
निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
******
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
******
उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
******
चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
******
नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
******
माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
******
सत्याने मिळतं तेच टिकतं.
******
जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
******
परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
******
हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
******
स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
******
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
******
खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.
******
तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
******
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
****** कविता म्हणजे भावनांचं चित्र!
******
संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
******
तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
******
ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
******
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
******
अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
******
तुलना करावी पण अवहेलना करू नये.
******
समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.
******
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
******
मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.
******
चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.
******
व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्विकारा.
******
आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
******
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
******
अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
******
विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
******
मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
******
आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
******
आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
******
प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षा नाही.
****** तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
******
सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
******
काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.
******
लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
******
चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
******
तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
******
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
******
चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
******
आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
******
उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.
******
पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
******
अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.
******
मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
******
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
******
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !
******
अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
******
अंथरूण बघून पाय पसरा.
******
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात.
******
तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
******
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
****** लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
******
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
******
जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
******
पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
******
आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
******
गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
******
कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
******
स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
******
ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.
******
जो स्वतःवर  करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !
******
सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
******
श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
******
आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
******
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
******
प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
******
आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
******
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
******
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
******
अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.
******
हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
****** काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
******
काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
******
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
******
हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
******
उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
******
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
******
तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !
******
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
******
दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
******
माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
******
प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
******
व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
******
काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
******
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
******
शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
******
जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
******
दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.
******
शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
******
जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.
******
परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.
****** ऎकावे जनाचे करावे मनाचे.
******
एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
******
केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
******
बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
******
चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
******
तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
******
दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
******
स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
******
स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.
******
त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !
******
जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
******
दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
******
पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
******
उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
******
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
******
मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
******
आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.
******
मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
******
बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
******
तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
******