शुक्रवार, २३ जुलै, २०२१

तांदूळ वाटप डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021, 104 दिवस

Download 

गुरुपौर्णिमा

आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो. ज्यांनी महाभारत लिहिले अशा व्यास ऋषींना वंदन करण्याचा त्यांची पूजा करण्याचा हा शुभदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरु अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना, गुरूंना वंदन करावे असे आपले शास्त्र सांगते. महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे आणि शास्त्राचे मूलाधार मानले जातात. आपल्या देशात महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आलेली आहे. अशा या गुरूंना मान देणे आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली ती आजपर्यंत चालू आहे. आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. शुक्राचार्य- जनक, कृष्ण,सुदामा- सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम - कर्ण, अर्जुन - द्रोणाचार्य. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.

भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश, गुरु शिष्याला ज्ञान देतात तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूची प्रार्थना करायची. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे परंतु घटाने, घागरीने पाणी खाली वाकल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा .....

मंगळवार, २० जुलै, २०२१

आषाढी एकादशीची कथा....

 


तुम्हा सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...




आषाढ महिन्यातील अकरावी तिथी ही देवशयनी आषाढी एकादशी म्हणून ओळखली जाते. हा मोठा पवित्र दिवस आहे. या दिवशी उपवास केला जातो. या दिवसापासून चतुङ्र्कास (चार महिन्यांचा काळ) सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे, क्षीरसागरात शेषनागावर, योगनिद्रेस जातात आणि योगनिद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला. या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो. पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे.

 

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

 

पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे. 

 

पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे. 

 

एकादशीची कथा

मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराने प्रसन्न होऊन तू कोणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील,' असा वर दिला होता. या वरामुळे उन्मत झालेला राक्षसाने देवांवर स्वारी केली. यावेळी सर्व देव मदतीसाठी शंकराकडे धावले. मात्र शंकारांनाही काही करता येत नव्हते. यावेळी देव शंकरासह एका गुहेत जाऊन लपून बसले. यावेळी देवांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिने मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली. त्या दिवशी पाऊस पडत होता. त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले. तसेच सर्वजन गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात पडला. या देवीचे नाव होते एकादशी

शास्त्रानुसार, जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णुसह देवी एकादशीची मनोभावे पूजा करतो ती व्यक्ती पापमुक्त होते असे म्हटले जाते. तसेच त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होते. 

चंद्रभागेच्या वाळवंटा पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलिक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे देवालय एका टेकडावर आहे. सुमारे 52 मीटर रुंद व 106 मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायर्‍या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला ‘नामदेव पायरी’ म्हणतात. कोपर्‍यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेकपत्ती वगैरे चुनेगच्ची नक्षीकाम आहे.

       तुम्हा सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...