मंगळवार, २० जुलै, २०२१

आषाढी एकादशीची कथा....

 


तुम्हा सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...




आषाढ महिन्यातील अकरावी तिथी ही देवशयनी आषाढी एकादशी म्हणून ओळखली जाते. हा मोठा पवित्र दिवस आहे. या दिवशी उपवास केला जातो. या दिवसापासून चतुङ्र्कास (चार महिन्यांचा काळ) सुरू होतो, तो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे, क्षीरसागरात शेषनागावर, योगनिद्रेस जातात आणि योगनिद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला. या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो. पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे.

 

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

 

पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे. 

 

पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे. 

 

एकादशीची कथा

मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराने प्रसन्न होऊन तू कोणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील,' असा वर दिला होता. या वरामुळे उन्मत झालेला राक्षसाने देवांवर स्वारी केली. यावेळी सर्व देव मदतीसाठी शंकराकडे धावले. मात्र शंकारांनाही काही करता येत नव्हते. यावेळी देव शंकरासह एका गुहेत जाऊन लपून बसले. यावेळी देवांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिने मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली. त्या दिवशी पाऊस पडत होता. त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले. तसेच सर्वजन गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात पडला. या देवीचे नाव होते एकादशी

शास्त्रानुसार, जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णुसह देवी एकादशीची मनोभावे पूजा करतो ती व्यक्ती पापमुक्त होते असे म्हटले जाते. तसेच त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होते. 

चंद्रभागेच्या वाळवंटा पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलिक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे देवालय एका टेकडावर आहे. सुमारे 52 मीटर रुंद व 106 मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक द्वार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायर्‍या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला ‘नामदेव पायरी’ म्हणतात. कोपर्‍यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेकपत्ती वगैरे चुनेगच्ची नक्षीकाम आहे.

       तुम्हा सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...